Posts

वाङ्मयीन नियतकालिकांचे संपादन

  वाङ्मयीन नियतकालिकांचे  संपादन...           वाङ्मयीन पर्यावरण निर्माण करण्‍यात वाङ्मयीन नियतकालिके महत्‍वाची भूमिका बजावत असतात. वाङ्मयीन नियतकालिकात साहित्‍य समीक्षा ग्रंथ परीक्षणे , आत्‍मकथन व साहित्‍याशी निगडीत लेखन प्रकाशित केले जाते. याबरोबरच समाज व चळवळीला देखील प्रेरणा देण्‍याचे सामर्थ्‍य दर्जेदार वाङ्मयीन नियतकालिकात असते. संपादकाच्‍या ज्ञानाच्‍या   उंचीवर   नियतकालिकांचा   दर्जा   ठरतो. त्‍या त्‍या परिसरात वाङ्मयीन नियतकालिके आज निघत आहेत. पण संपादकाच्‍या स्‍वार्थी दृष्टिकोणामुळे , प्रयत्‍न व निष्‍ठेच्‍या अभावामुळे   ती   नियतकालिके   अल्‍पजीवी ठरत आहेत. संपादकाची दूरदृष्‍टी अतिशय महत्‍वाची असते. संपादकाकडे संयम असणे गरजेचे आहे. कारण वाङ्मयीन नियतकालिकांना तात्‍काळ प्रतिसाद व लोकप्रियता मिळत नाही.           लेखकाच्‍या लेखनावर संस्‍कार करून समर्पित भावनेने काम करणारे संपादक ज्‍या वाङ्मयीन नियतकालिकांना लाभले , ती वाङ्मयीन नियतकालिके   वाचकांचा   -हद...

पर्यावरण आणि युवक

      विश्वात सर्व क्षेत्रात ज्या काही क्रांत्या झालेल्या आहेत, त्यात युवकांचा खूप मोठा वाटा राहिलेला आहे. ज्येष्ठांकडून असे बोलले जाते की, आजची तरुणाई बिघडलेली आहे. यात काही तथ्य असले तरी परिवर्तनात, चळवळीत युवकांचा जो सहभाग राहिलेला आहे, त्याला देखील नाकारता येत नाही. कोणत्याही चळवळीत बहुतांश ज्येष्ठ मार्गदर्शन करतात. युवक मात्र प्रत्यक्ष कृती करतात. दहा वर्षांपूर्वी महाविद्यालयीन युवक-युवती जेव्हा कविता लिहायचे तेव्हा त्यांच्या बहुतांशा कवितेचा विषय प्रेम, विनोद असायचा. आज मात्र युवाशक्ती संवेदनशीलतेने पर्यावरण, शेतकरी आत्महत्या, समाजात एखादी घडलेली विदारक घटना या विषयावर गांभीर्याने लेखन करीत आहे.       भारतातील ऐंशी ते नव्वद टक्के वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यरत आहे. ‘पर्यावरण आणि नैसर्गिक साधन संपत्ती संवर्धन आणि युवक’ यासारख्या शीर्षकाखाली महाविद्यालयाच्या वतीने ग्रामीण भागात सात दिवसाचे शिबीर घेतले जाते. युवक तिथे मुक्कामी राहतात. कृती, व्याख्यान, प्रयोग या माध्यमातून प्रत्यक्ष विद्यार्थी सहभागी होतात. सामाजिक बांधिल...

विचारशील व्यक्तिमत्त्व : न्या.नरेंद्र चपळगावकर

       माजी न्यायमूर्ती नरेंद्र पुरुषोत्तम चपळगावकर यांचा मूळ पिंड हा वैचारिकतेचा आहे. साहित्याची आवड असल्यामुळे एल.एल.बी.ची पदवी प्राप्त केल्यानंतर मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण त्यांनी पूर्ण केले. लातूर व औरंगाबाद येथे काही काळ मराठी विषयाचे  अध्यापन करून इ. स.१९६२ साली वकिली व्यवसायाला सुरूवात केली. १९९० साली मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली व १९९९ साली ते सेवानिवृत्त झाले. त्यांच्या  आई - वडिलांवर लहानपणीच स्वातंत्र्यलढ्याचे संस्कार झाले होते. वडील स्वामी रामानंद तीर्थ यांचे अनुयायी होते. त्यामुळे अनंत भालेरावांच्या सहवासात काही काळ नरेंद्र चपळगावकरांना राहता आले. स्वातंत्र्योत्तर मराठवाड्यातील वैचारिक लेखकात न्या.नरेंद्र चपळगावकर हे एक महत्त्वाचे नाव आहे. चपळगावकरांनी संयमितपणे समन्वयवादी भूमिका घेऊन वैचारिक लेखन केले. जुन्या हैदराबाद संस्थानात न्या.कोरटकर, न्या.एकबोट आणि महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर न्या.व्यंकटराव देशपांडे, न्या.कुर्डूकर व न्या.कानडे मराठवाड्यात होऊन गेले. परंतु वैचारिक लेखनात न्या.चपळगावकर यांनी स्व...

प्रयोगशील प्राचार्य : डॉ. ना.य.डोळे

      समाजाचे सुद्धा एक  विद्यापीठ असते. या विद्यापीठात जे काही मिळते त्याची तुलना कशासीही करता येत नाही. या विद्यापीठात काम केल्यास समाजात कायमची नोंद होते. शैक्षणिक क्षेत्रात व प्रशासनात काम करत असताना सामाजिक क्षेत्रात तळागाळातल्या माणसापर्यंत जाऊन काम करणे ही तारेवरची कसरत असते. समाजाचे प्रबोधन केवळ कार्यकर्त्यांनीच करावे असे म्हणणे देखील चुकीचे आहे.वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना विशेष करून शिक्षकी पेशा स्वीकारलेल्या लोकांचे कर्तव्य आहे की,त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे.हे काम उदगीर परिसरात अतिशय तन्मयतेने प्राचार्य डॉ.ना.य.डोळे सरांनी  विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात केले होते.        शहरातील लोकांना खेड्यात येऊन काम करणे, तेथील वातावरणाशी व संस्कृतीशी जुळवून घेणे म्हणावे तितके सोपे नसते. मुंबई, पुण्यातील लोकांच्या दृष्टीने उदगीरसारखे ठिकाण त्याकाळी तर एक खेडेचं. शिकलेली पिढी आज साधारणपणे शहराकडे धावत आहे. कुठलीच सुविधा व भौतिक साधने ज्या ठिकाणी उपलब्ध नव्हते, अशा सीमाभागावर वसलेल्या उदगीरमध्ये इ.स.१९६२ साली डॉ.नारायण यशवंत डोळे...

हुंदका मनातला

  हुंदका मनातला (आज जागतिक पुस्तक दिन)           लेखक का लिहितो? हा मनाला पडलेला प्रश्न वरवरचा वाटत असला तरी तितकाच चिंतनाचा देखील आहे. का वाचावीत पुस्तकं? ग्रंथ हाच माणसाचा गुरू आहे. यासंबंधी नेहमी अनेकजण भाष्य करीत असतात. एखाद्या वेळी वाचण, ऐकण,पहाण,गप्पा मारण खूप सोप आहे, पण लिहिण मात्र तितकं सोपं नाही. लिहिण्यासाठी एक प्रकारची शिस्त लागते. साधना, त्याग, बैठक, एकाग्रता, संवेदनशीलता , निरीक्षण ,कळवळा  व काही प्रमाणात कल्पकता इत्यादी गुण असल्याशिवाय  लेखक लिहू शकत नाही. लेखक स्वतःचा शोध घेत घेत समाजाचा देखील शोध घेतो. मनात जे काही डबकं साचलेल असत त्याला वाट करून द्यावी, या हेतूने लेखक आपली लेखणी चालवितो. लेखनाची काही कार्यशाळा असते का? काहीजण कार्यशाळा घेत असतात. परंतु मला असं वाटत नाही की कार्यशाळेतून लेखक जन्माला येतं असतात. एखाद्या इंजिनियरला वाटलं की आपण आपल्या मुलाला इंजिनियर करावं, तर तो एखाद्या वेळेस करू शकतो. कुठल्याही व्यवसायातील माणसाला जर वाटलं आपण आपल्या मुलाला या व्यवसायात आणावं तर तो आणू शकतो. तो जरी  फ...

मूकनायक युगायुगातून एकदाच जन्माला येतो

  मूकनायक युगायुगातून एकदाच जन्माला येतो         महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे असे एक महापुरूष आहेत की, ज्यांच्यावर अनेक लेखकांनी मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य लिहिले. ज्यात चरित्र, कविता व समीक्षा इत्यादीचा समावेश मोठ्या प्रमाणामध्ये आहे.    महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्माआधी लायक असलेल्या नायकाकडे खलनायक, अतिशूद्र म्हणून पाहिले जात होते. खलनायक हे नायकाप्रमाणे जगत होते. जे खरोखरच नायक होते ते अज्ञान व अंधश्रद्धेमुळे किंवा नाईलाजाने पशुतुल्य जीवन जगत होते. तशी परिस्थिती निर्माण केली गेली होती. अशा माणसाचा स्वाभिमान, अस्मिता व तेजस्विता जागृत करण्याचे महान कार्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले. आंबेडकरांमुळेच शोषित वर्गातील लोकांचा मूकस्वर मुक्तस्वर झाला. व मूकनायक असलेले मुक्तनायक झाले. विश्वात असे मोजकेच समाजसुधारक, महापुरुष व विचारवंत आहेत की, ज्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. डॉ. बाबासाहेबांची विचारधारा डोळ्यासमोर ठेवून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व विशेष करून साहित्याच्या क्षेत्रात दलित साहित्य व समीक्षकांनी जी भरारी घेतलेली आहे...

सत्यअसत्याशी मन केले ग्वाही

  सत्यअसत्याशी मन केले ग्वाही आज ' तुकाराम बीज ' त्यानिमित्त...      वारकरी संप्रदायामध्ये संत तुकाराम महाराजांचे स्थान अनन्यसाधारण स्वरूपाचे आहे. या संप्रदायाची लोकप्रियताच संत तुकारामामुळे वाढली, हे सत्य कोणालाही नाकारता येत नाही. एखादे दैवत व गुरूचा नावलौकिक  शिष्यामुळे होतो, याचे उत्तम उदाहरण म्हणून संत तुकारामादी संतांचे देता येईल.संत तुकारामांचे व्यक्तिमत्व व साहित्य म्हणजे महाराष्ट्रातल्या वैचारिक, प्रबोधनात्मक आणि सांस्कृतिक क्षेत्रातले एक महत्त्वाचे दस्तऐवज म्हणता येईल. तुकोबांनी लेखणीद्वारे प्रवाहाच्या विरोधात जाऊन वाटचाल केली.  'बुडती हे जन न देखवे डोळा ' या संवेदनेतून तुकोबांच्या अभंगाची निर्मिती झाली.त्यामुळे केवळ महाराष्ट्रातच नाही, तर भारतात व परदेशात ही तुकोबांचे विचार पोहोचले. प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल समजून कार्य करत राहण्याचा समंजसपणा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. त्यामुळेच तर तुकोबा आकाशाएवढे झाले. सज्जनांच्या संदर्भात मेणाहून मऊ होणारे तुकोबा दुर्जनांच्या संदर्भात मात्र वज्राहून कठोर होतात. एक संत, कवी, सुधारक,विचारवंत व लोकशिक...