Posts

सत्यअसत्याशी मन केले ग्वाही

  सत्यअसत्याशी मन केले ग्वाही आज ' तुकाराम बीज ' त्यानिमित्त...      वारकरी संप्रदायामध्ये संत तुकाराम महाराजांचे स्थान अनन्यसाधारण स्वरूपाचे आहे. या संप्रदायाची लोकप्रियताच संत तुकारामामुळे वाढली, हे सत्य कोणालाही नाकारता येत नाही. एखादे दैवत व गुरूचा नावलौकिक  शिष्यामुळे होतो, याचे उत्तम उदाहरण म्हणून संत तुकारामादी संतांचे देता येईल.संत तुकारामांचे व्यक्तिमत्व व साहित्य म्हणजे महाराष्ट्रातल्या वैचारिक, प्रबोधनात्मक आणि सांस्कृतिक क्षेत्रातले एक महत्त्वाचे दस्तऐवज म्हणता येईल. तुकोबांनी लेखणीद्वारे प्रवाहाच्या विरोधात जाऊन वाटचाल केली.  'बुडती हे जन न देखवे डोळा ' या संवेदनेतून तुकोबांच्या अभंगाची निर्मिती झाली.त्यामुळे केवळ महाराष्ट्रातच नाही, तर भारतात व परदेशात ही तुकोबांचे विचार पोहोचले. प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल समजून कार्य करत राहण्याचा समंजसपणा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. त्यामुळेच तर तुकोबा आकाशाएवढे झाले. सज्जनांच्या संदर्भात मेणाहून मऊ होणारे तुकोबा दुर्जनांच्या संदर्भात मात्र वज्राहून कठोर होतात. एक संत, कवी, सुधारक,विचारवंत व लोकशिक...

आई मला फुलू दे !

आई मला फुलू दे ! पथनाटय संहिता - म.ई.तंगावार गर्भ :     मला वाचवा ! वाचवा !! वाचवा !!! (दोन वेळा)डॉक्‍टर साहेब, आई, बाबा, महाराज मला वाचवा ! वाचवा ! ! वाचवा ! ! ! भारूडकार : ये काय झालं गं? का ओरडतेस तू  ? गर्भ : महाराज  मी स्‍त्री आहे म्‍हणून मला उमलू, फुलू द्यायचं नाही, असं सर्वांनी ठरवलं आहे. फक्‍त माझे बाबा तेवढं सहकार्य  करतात मला. तुम्‍ही सांगा ना समजावून  त्‍यांना. (सगळेजण येतात) भारूडकार     : अहो सगळयांचं  तुमचं  काय चालू आहे ? थांबा... थांबा... थांबा.... पहिले नमन माझे जनाईला (कोरस) दुसरे नमन माझे मुक्‍ताईला (कोरस) तिसरे नमन माझे सावित्रीला (कोरस) चौथे नमन माझे रमाईला (कोरस) पाचवे नमन माझे बहिणाबाईला (कोरस) या सा-यांनी फुलविला मळा  चला हो वंदन  करूया त्‍यांना.(दोन वेळा) ऐका,(तीन वेळा) स्‍त्री पूर्वीही कमी नव्‍हती, आजही नाही. ‘डोईचा पदर आला खांद्यावरी/ भरल्‍या बाजारी जाईन मी’ अशा प्रकारचं  बंड मध्‍ययुगीन काळात जनाईनं पुकारलं होतं. लहान असूनही मुक्‍ताबाईने ‘तुम्‍ही तारूनि  विश्‍व तारा| ताटी उघडा...

मराठी भाषा व साहित्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी

  मराठी भाषा व साहित्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी             समाज व संस्कृतीचे वाहक म्हणून आपण भाषा व साहित्य याकडे पाहत असतो. महाराष्ट्रातील मराठी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची बेकारी मोठ्या प्रमाणात आहे, हे काही प्रमाणात तथ्य असले तरी रोजगाराच्या कुठल्याच संधी उपलब्ध नाहीत, असे म्हणणे देखील चुकीचे आहे. ज्यांच्याकडे कौशल्य आहे, जो प्रामाणिकपणे एखादे काम करतो, सातत्य व जिद्द ज्यांच्यामध्ये आहे, ते शक्यतो बेकार राहू शकत नाहीत. आपल्या स्वतःच्या विश्वकोशातला पहिला शब्द म्हणजे आळस हा दुर्गुण. त्यामुळे आपणास अनेक संकटाला तोंड द्यावे लागते. जीवन व्यवहाराच्या सर्वच क्षेत्रात साहित्य व भाषेची आवश्यकता असते. भाषेशी संबंधित करिअरची क्षेत्रे शेकडो आहेत. कुठल्याही गोष्टीविषयी मनात साशंकता असेल तर आत्मविश्‍वास कमी पडतो. आत्मविश्वासाने व गांभीर्याने आपल्यातला राजहंस ओळखून आपण जर भाषा व साहित्याचा विचार केला तर लक्षात येईल की, यात जागोजागी संधी दडलेल्या आहेत. आकाश खूप मोकळं व स्वच्छ आहे. गरज आहे आपण खिडकी काढून बाहेर पाहण्याची.  ...

छत्रपती शिवाजी महाराज आणि पर्यावरण

  छत्रपती शिवाजी महाराज आणि पर्यावरण                  आरमारासाठी लाकूड असे वापरा की जे शेतकऱ्यांच्या हिताचे, उपयोगाचे नसले पाहिजेत, असे सांगत पर्यावरण संवर्धनाची काळजी घेणारे छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने  पर्यावरणाचे रक्षण होते. जलसंवर्धन, वनसंवर्धन, तलाव, टाकी, विहिरी या संबंधी शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन मुळातच आजही प्रासंगिक वाटायला लागतो. असेही सांगितले जाते की, पुरंदरसारख्या किल्ल्यावर अवतीभोवती जी झाडे आहेत,ती औषधासाठी उपयुक्त आहेत. जखमी सैनिकांना इलाज करण्यासाठी त्यांनी तिथे  झाडपाल्याचे वैद्य ठेवले होते. गडावर त्या काळात त्यांनी शौचालये बांधली होती. प्रासंगिक स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराजांनी वेळोवेळी जी पत्रे लिहिलेली आहेत, त्यात पर्यावरणाचा फार मोठा संदेश दडलेला आहे. डॉ.प्र.न.देशपांडे यांचा 'छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे' हा ग्रंथ इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळाच्या वतीने प्रकाशित करण्यात आला. या ग्रंथात एकूण दोनशे तीन पत्रे आहेत. त्यातील काही पत्रात प्राणीमात्रां...

पर्यावरण संवर्धन काळाची गरज

  पर्यावरण संवर्धन काळाची गरज           पर्यावरणाची समस्या ही गंभीर होत चालली आहे. आज या समस्येला वैश्विक रूप प्राप्त झाले. पन्नास वर्षांपूर्वी पर्यावरण या विषयावर जगात अशी चर्चा होत नव्हती, परंतु आज प्रमुख विषयांपैकी हा एक महत्त्वाचा विषय बनलेला आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे. पर्वताच्या प्रदेशात भूस्खलन वाढत आहेत. नदीकाठच्या गावांना सातत्याने महापुराचा तडाखा बसत आहे. शहरीकरण व औद्योगिकीकरणात वाढ झाली. शेतकरी रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अति वापर करीत आहे. चक्रीवादळ, भूकंप यासारख्या आपत्तीमध्ये वाढ झाली आहे. एवढेच नव्हे, तर माणसाचे आयुष्य देखील कमी होत चालले आहे. या सर्व व गोष्टीला पर्यावरणाचे बिघडलेले समतोल कारणीभूत आहे.            पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणासाठी अनेक गोष्टींची काळजी घेणे सध्या तरी गरजेचे वाटते. माती, हवा व पाणी हे खरे तर निसर्गाचे प्राण आहेत. या घटकाशिवाय माणूस देखील जगू शकत नाही. या महत्त्वाच्या घटकांची प्रकृती ही मोठ्या प्रमाणात बिघडून...