Posts

Showing posts from April, 2026

अनाथाचा नाथ दीनाचा दयाळ

Image
  अनाथाचा नाथ दीनाचा दयाळ                   हिरेमठ संस्थान भालकी येथील पूजनीय डॉ.बसवलिंग पट्टदेवरु महाराज यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे समाजासाठी नि:स्वार्थपणे काम करणाऱ्या संतांचे उत्तम उदाहरण होय. एखाद्या संतांनी समाजाचे प्रबोधन करीत असताना कृतीच्या माध्यमातून सामाजिक काम कसं करावं? याचा आदर्श वस्तुपाठ परमपूज्य डॉ. बसवलिंग पट्टदेवररु यांनी घालून दिलेला आहे. भालकी येथील गुरुकुल संस्था केवळ शैक्षणिक केंद्र नाही, तर एक संस्कारचे आणि सामाजिक प्रबोधनाचे विद्यापीठ आहे. याच गुरुकुलमध्ये पूज्य डॉ.पट्टदेवरू अनाथ मुलांचे पालन पोषण करतात. ज्यांचा वाली कोणीच नाही, जो दीन, दुबळा , दुःखी आणि संकटात आहे. ज्याच्यावर नको ती वेळ आलेली आहे, अशा पोरक्या लेकरांना , निराधारांना आधार देण्याचे काम अनेक वर्षापासून गुरुकुल मध्ये  केले जात आहे.             पूज्य डॉ.बसवलिंग पट्टदेवरु यांनी जवळपास १०५ अनाथ  मुलांना दत्तक घेतले. तिथे मुलांवर उपचार, संस्कार झाल्यानंतर काही मुलं बेंगलोरला पाठविण्यात आले,तर विदेशातील लोकांनी जवळपास...