मराठी भाषा व साहित्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी
मराठी भाषा व साहित्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी समाज व संस्कृतीचे वाहक म्हणून आपण भाषा व साहित्य याकडे पाहत असतो. महाराष्ट्रातील मराठी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची बेकारी मोठ्या प्रमाणात आहे, हे काही प्रमाणात तथ्य असले तरी रोजगाराच्या कुठल्याच संधी उपलब्ध नाहीत, असे म्हणणे देखील चुकीचे आहे. ज्यांच्याकडे कौशल्य आहे, जो प्रामाणिकपणे एखादे काम करतो, सातत्य व जिद्द ज्यांच्यामध्ये आहे, ते शक्यतो बेकार राहू शकत नाहीत. आपल्या स्वतःच्या विश्वकोशातला पहिला शब्द म्हणजे आळस हा दुर्गुण. त्यामुळे आपणास अनेक संकटाला तोंड द्यावे लागते. जीवन व्यवहाराच्या सर्वच क्षेत्रात साहित्य व भाषेची आवश्यकता असते. भाषेशी संबंधित करिअरची क्षेत्रे शेकडो आहेत. कुठल्याही गोष्टीविषयी मनात साशंकता असेल तर आत्मविश्वास कमी पडतो. आत्मविश्वासाने व गांभीर्याने आपल्यातला राजहंस ओळखून आपण जर भाषा व साहित्याचा विचार केला तर लक्षात येईल की, यात जागोजागी संधी दडलेल्या आहेत. आकाश खूप मोकळं व स्वच्छ आहे. गरज आहे आपण खिडकी काढून बाहेर पाहण्याची. ...