बिकट वाट वहिवाट नसावी
कविता आणि व्यक्तिमत्त्व विकास बिकट वाट वहिवाट नसावी : अनंत फंदी ललित साहित्याचा संबंध व्यक्तिमत्त्व विकासाशी असतो का?असा प्रश्न काही जणांना पडतो. पण काही कलाकृतीच्या बाबतीत त्याचे उत्तर होकारात्मक असेच द्यावे लागेल. एखाद्या कवितेचा विचार व्यक्तिमत्त्व विकासाच्या अंगाने करता येऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणून अनंत फंदी यांच्या 'बिकट वाट वहिवाट नसावी' या कवितेचे देता येईल. आपल्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांचा व्यक्तिमत्त्व विकास झाला नसेल तर स्वतःचा विकास होणे इतके सोपे नसते. म्हणून मला वाटते की, व्यक्तिमत्त्व विकासाचा संबंध हा सामाजिक बांधिलकीशी देखील आहे. उगीच म्हटले नाही संतांनी 'बुडती हे जण न देखवे डोळा येतो कळवळा म्हणूनीया' अनंत फंदी यांनी प्रस्तुत कवितेतून उपदेशात्मक पद्धतीने अगदी सोप्या भाषेत व्यक्तिमत्त्व विकासाचा सुलभ असा मार्ग सांगितलेला आहे. शाहीर अनंत भवानीबाबा घोलप हे अठराव्या शतकातील एक महत्त्वाचे कवी होते. यांचे मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर. सराफी व ग...