हुंदका मनातला
हुंदका मनातला (आज जागतिक पुस्तक दिन) लेखक का लिहितो? हा मनाला पडलेला प्रश्न वरवरचा वाटत असला तरी तितकाच चिंतनाचा देखील आहे. का वाचावीत पुस्तकं? ग्रंथ हाच माणसाचा गुरू आहे. यासंबंधी नेहमी अनेकजण भाष्य करीत असतात. एखाद्या वेळी वाचण, ऐकण,पहाण,गप्पा मारण खूप सोप आहे, पण लिहिण मात्र तितकं सोपं नाही. लिहिण्यासाठी एक प्रकारची शिस्त लागते. साधना, त्याग, बैठक, एकाग्रता, संवेदनशीलता , निरीक्षण ,कळवळा व काही प्रमाणात कल्पकता इत्यादी गुण असल्याशिवाय लेखक लिहू शकत नाही. लेखक स्वतःचा शोध घेत घेत समाजाचा देखील शोध घेतो. मनात जे काही डबकं साचलेल असत त्याला वाट करून द्यावी, या हेतूने लेखक आपली लेखणी चालवितो. लेखनाची काही कार्यशाळा असते का? काहीजण कार्यशाळा घेत असतात. परंतु मला असं वाटत नाही की कार्यशाळेतून लेखक जन्माला येतं असतात. एखाद्या इंजिनियरला वाटलं की आपण आपल्या मुलाला इंजिनियर करावं, तर तो एखाद्या वेळेस करू शकतो. कुठल्याही व्यवसायातील माणसाला जर वाटलं आपण आपल्या मुलाला या व्यवसायात आणावं तर तो आणू शकतो. तो जरी फ...