सत्यअसत्याशी मन केले ग्वाही
सत्यअसत्याशी मन केले ग्वाही आज ' तुकाराम बीज ' त्यानिमित्त... वारकरी संप्रदायामध्ये संत तुकाराम महाराजांचे स्थान अनन्यसाधारण स्वरूपाचे आहे. या संप्रदायाची लोकप्रियताच संत तुकारामामुळे वाढली, हे सत्य कोणालाही नाकारता येत नाही. एखादे दैवत व गुरूचा नावलौकिक शिष्यामुळे होतो, याचे उत्तम उदाहरण म्हणून संत तुकारामादी संतांचे देता येईल.संत तुकारामांचे व्यक्तिमत्व व साहित्य म्हणजे महाराष्ट्रातल्या वैचारिक, प्रबोधनात्मक आणि सांस्कृतिक क्षेत्रातले एक महत्त्वाचे दस्तऐवज म्हणता येईल. तुकोबांनी लेखणीद्वारे प्रवाहाच्या विरोधात जाऊन वाटचाल केली. 'बुडती हे जन न देखवे डोळा ' या संवेदनेतून तुकोबांच्या अभंगाची निर्मिती झाली.त्यामुळे केवळ महाराष्ट्रातच नाही, तर भारतात व परदेशात ही तुकोबांचे विचार पोहोचले. प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल समजून कार्य करत राहण्याचा समंजसपणा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. त्यामुळेच तर तुकोबा आकाशाएवढे झाले. सज्जनांच्या संदर्भात मेणाहून मऊ होणारे तुकोबा दुर्जनांच्या संदर्भात मात्र वज्राहून कठोर होतात. एक संत, कवी, सुधारक,विचारवंत व लोकशिक...