Posts

Showing posts from February, 2025

भारताच्या राजधानीतील मराठी साहित्यिक

 भारताच्या    राजधानीतील मराठी साहित्यिक               मराठीतील प्रसिद्ध कवी व गीतकार राजा बढे यांनी ‘दिल्लीचेही तक्त राखितो, महाराष्ट्र माझा’ असे म्हटले आहे. उद्योग, राजकारण व सांस्कृतिक क्षेत्रात अनेकांनी दिल्लीत आपले वर्चस्व निर्माण केले. सतराव्या - अठराव्या शतकात मराठी सैनिकांनी देखील दिल्लीत पराक्रम गाजवला. साहित्याच्या बाबतीत दिल्लीतही दारिद्रय नाही. हे दिल्लीतील साहित्य‍िकांचा परिचय करून घेतल्यानंतर लक्षात येते. दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ व सरहद पुणे यांच्यावतीने आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठी माणूस व संस्कृती याचा परिचय संपूर्ण जगाला होईल; हे सत्य नाकारता येत नाही. राजधानीत ४० ते ५० वर्षापासून स्थायिक असलेले काही लेखक मराठी साहित्य व संस्कृतीची सेवा करताना दिसतात. अगदी एकविसाव्या शतकातील काहीजण मराठीत समर्थपणे लेखन करीत आहेत. त्यांच्या लेखनकार्याचा धांडोळा घ्यावा, हे या लेखामागचे  प्रयोजन आहे.             प्रस्तुत लेखाच्या सुरुवातीला मिरजकर ...