पर्यावरण आणि युवक
विश्वात सर्व क्षेत्रात ज्या काही क्रांत्या झालेल्या आहेत, त्यात युवकांचा खूप मोठा वाटा राहिलेला आहे. ज्येष्ठांकडून असे बोलले जाते की, आजची तरुणाई बिघडलेली आहे. यात काही तथ्य असले तरी परिवर्तनात, चळवळीत युवकांचा जो सहभाग राहिलेला आहे, त्याला देखील नाकारता येत नाही. कोणत्याही चळवळीत बहुतांश ज्येष्ठ मार्गदर्शन करतात. युवक मात्र प्रत्यक्ष कृती करतात. दहा वर्षांपूर्वी महाविद्यालयीन युवक-युवती जेव्हा कविता लिहायचे तेव्हा त्यांच्या बहुतांशा कवितेचा विषय प्रेम, विनोद असायचा. आज मात्र युवाशक्ती संवेदनशीलतेने पर्यावरण, शेतकरी आत्महत्या, समाजात एखादी घडलेली विदारक घटना या विषयावर गांभीर्याने लेखन करीत आहे. भारतातील ऐंशी ते नव्वद टक्के वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यरत आहे. ‘पर्यावरण आणि नैसर्गिक साधन संपत्ती संवर्धन आणि युवक’ यासारख्या शीर्षकाखाली महाविद्यालयाच्या वतीने ग्रामीण भागात सात दिवसाचे शिबीर घेतले जाते. युवक तिथे मुक्कामी राहतात. कृती, व्याख्यान, प्रयोग या माध्यमातून प्रत्यक्ष विद्यार्थी सहभागी होतात. सामाजिक बांधिल...